Featured Posts

Monday, July 27, 2009

_______ Damalelya babachee kahani _______

  • SEE THIS BLOG IS NOT FOR SONGS AND ALL...BUT I AM A MARATHI PERSON N I LOVE SANDEEP'S N SALIL'S SINGING AND POETRY ..... N THIS "DAMLELYA BABACHEE KAHANI" SONG IS JUST TOO GOOD.....
  • हे व्हीडीओ वरून ऑडियो केलेले आहे जे टी.व्ही वर दाखवले गेले होते ... तर मग याची AUDIO QUALITY कदाचितनीट नसेल तर तेवढे सांभाळूण घ्या धन्यवाद
  • ORIGINAL RECODED AUDIO OF THIS SONGS IS NOT AVAILABLE SO I HAVE ADDED THIS SONG WITH THE CONVERSATION FOR THE WHOLE EFFECT OF MUSIC
  • Title : - damalelya babachee kahani
  • Album :- aggubai-thaggubai
  • music quality : - auditorium effect[2/5]
  • Audio
CLICK HERE इथे क्लिक करा

  • Video
CLICK HERE इथे क्लिक करा
  • Lyrics

  • दमलेल्या बापाची कहाणी



  • "अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्याभूमिकेतून "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:
  • (सलीलचा आवाज) पद्य:
......
  • कोमेजून निजलेली एक परी राणी
  • उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
  • रोजचेच आहे सारे काही आज नाही
  • माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
  • झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
  • निजेतच तरी पण येशील खुशीत
  • सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
  • दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
  • ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................


  • आटपाट नगरात गर्दी होती भारी
  • घामाघूम राजा तरी लोकलची वारी
  • रोज सकाळीच राजा निघताना बोले
  • गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
  • जमलेच नाही काल येणे मला जरी
  • आज परि येणार मी वेळेतच घरी
  • स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
  • खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
  • मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
  • दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
  • ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................

  • (संदीपचा आवाज) गद्य:
  • ऑफिसात उशीरा मी असतो बसून
  • भंडावले डोके गेले कामात बुडून
  • तास-तास जातो खाल मानेने निघून
  • एक-एक दिवा जातो हळूच विझून
  • अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
  • आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
  • वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
  • तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
  • उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
  • चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
.....................................................................
  • (सलीलचा आवाज) पद्य:
  • उधळत खिदळत बोलशील काही
  • बघताना भान मला उरणार नाही
  • हसूनिया उगाचच ओरडेल काही
  • दुरूनच आपल्याला बघणारी आई
  • तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
  • क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
  • सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
  • दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
  • ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................
  • (संदीपचा आवाज) गद्य:
  • दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
  • मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
  • गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
  • सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

.....................................................................
  • (सलीलचा आवाज) पद्य:
  • कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
  • सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
  • जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
  • आईपरी वेणी फणी करतो ना तुला
  • तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
  • तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
  • सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
  • दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
  • ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

.....................................................................
  • (संदीपचा आवाज) गद्य:
  • बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
  • आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
  • आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
  • रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
  • लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
  • दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं
.....................................................................
  • (सलीलचा आवाज) पद्य:
  • असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
  • हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
  • असा कसा बाबा देव लेकराला देतो
  • लवकर जातो आणि उशीरानं येतो
  • बालपण गेले तुझे-तुझे निसटून
  • उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
  • जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
  • नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
  • तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
  • मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
  • सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
  • बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
  • ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................
  • --- संदीप खरे.
.....................................................................



for all type of marathi stuff site dedicated to marathi and only marathi
proud to be a maharashtrian
  • also you can send me request for marathi song from comment.

Digg Google Bookmarks reddit Mixx StumbleUpon Technorati Yahoo! Buzz DesignFloat Delicious BlinkList Furl

3 comments: on "_______ Damalelya babachee kahani _______"

rohangaribe said...

fantastic job..
qualitty cha jau de..he gaana audio madhye tu available karun dilas hech kautukaspad aahe..

Chetan said...

i want AKB-500 video songs for download
.
thanx & regards

chetan chaudhari

Nadeem1414 said...

http://www.stories.pk i have visited to this site which tell us the excellent kahani.