- SEE THIS BLOG IS NOT FOR SONGS AND ALL...BUT I AM A MARATHI PERSON N I LOVE SANDEEP'S N SALIL'S SINGING AND POETRY ..... N THIS "DAMLELYA BABACHEE KAHANI" SONG IS JUST TOO GOOD.....
- हे व्हीडीओ वरून ऑडियो केलेले आहे जे टी.व्ही वर दाखवले गेले होते ... तर मग याची AUDIO QUALITY कदाचितनीट नसेल तर तेवढे सांभाळूण घ्या । धन्यवाद ।
- ORIGINAL RECODED AUDIO OF THIS SONGS IS NOT AVAILABLE SO I HAVE ADDED THIS SONG WITH THE CONVERSATION FOR THE WHOLE EFFECT OF MUSIC
- Title : - damalelya babachee kahani
- Album :- aggubai-thaggubai
- music quality : - auditorium effect[2/5]
- Audio
- Video
- Lyrics
दमलेल्या बापाची कहाणी
- "अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्याभूमिकेतून "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:
- (सलीलचा आवाज) पद्य:
- कोमेजून निजलेली एक परी राणी
- उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
- रोजचेच आहे सारे काही आज नाही
- माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
- झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
- निजेतच तरी पण येशील खुशीत
- सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
- दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
- ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
- आटपाट नगरात गर्दी होती भारी
- घामाघूम राजा तरी लोकलची वारी
- रोज सकाळीच राजा निघताना बोले
- गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
- जमलेच नाही काल येणे मला जरी
- आज परि येणार मी वेळेतच घरी
- स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
- खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी
- मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
- दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
- ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
- (संदीपचा आवाज) गद्य:
- ऑफिसात उशीरा मी असतो बसून
- भंडावले डोके गेले कामात बुडून
- तास-तास जातो खाल मानेने निघून
- एक-एक दिवा जातो हळूच विझून
- अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
- आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
- वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
- तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
- उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
- चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
- (सलीलचा आवाज) पद्य:
- उधळत खिदळत बोलशील काही
- बघताना भान मला उरणार नाही
- हसूनिया उगाचच ओरडेल काही
- दुरूनच आपल्याला बघणारी आई
- तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
- क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
- सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
- दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
- ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
- (संदीपचा आवाज) गद्य:
- दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
- मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
- गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
- सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
.....................................................................
- (सलीलचा आवाज) पद्य:
- कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
- सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
- जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
- आईपरी वेणी फणी करतो ना तुला
- तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
- तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
- सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
- दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
- ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
.....................................................................
- (संदीपचा आवाज) गद्य:
- बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
- आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
- आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
- रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
- लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
- दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं
- (सलीलचा आवाज) पद्य:
- असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
- हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
- असा कसा बाबा देव लेकराला देतो
- लवकर जातो आणि उशीरानं येतो
- बालपण गेले तुझे-तुझे निसटून
- उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
- जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
- नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
- तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
- मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
- सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
- बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
- ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
- --- संदीप खरे.
- Also visit aamhimarathi.in
proud to be a maharashtrian
- also you can send me request for marathi song from comment.
3 comments: on "_______ Damalelya babachee kahani _______"
fantastic job..
qualitty cha jau de..he gaana audio madhye tu available karun dilas hech kautukaspad aahe..
i want AKB-500 video songs for download
.
thanx & regards
chetan chaudhari
http://www.stories.pk i have visited to this site which tell us the excellent kahani.
Post a Comment